
(संग्रही ठेवण्याच्या फोटोसाठी वरील फोटोवर राईट क्लिक करा व "Save Target" हा पर्याय वापरा)

आमचे प्रेरणास्थान
सद्गुरू दिगंबरपंत रवळेकर
नित्यपठणाच्या ५२ श्लोकी गुरुचरित्रासाठी येथे क्लिक करा.
श्रीदत्त संस्थान
या पानावरची माहिती श्रीदत्त संस्थान, बाळेकुंद्री यांच्या सल्ल्याने संकलीत केली आहे. संस्थानाचे कार्य खूप मोठे आहे. ह्या पानावर सर्व माहिती नाही. येथील मजकुरात यथावकाश भर घातली जाईल. हे संस्थानाचे अधिकृत पत्र नाही.श्रीपंत बाळेकुंद्री येथील सर्व कामकाज श्रीदत्त संस्थान पाहते. मंदिर परिसराची देखभाल, रोजची पूजाअर्चा, निवास व अन्नदान व्यवस्था ह्या जरी मुख्य बाबी असल्या तरी इतरही अनेक कार्ये ही संस्था करते. उत्सवांचे आयोजन, श्री पंतांच्या साहित्याचे प्रकाशन व एकंदरीत श्री पंतांचा व अवधूत संप्रदायाचा प्रसार हीसुद्धा महत्वाची कार्ये श्रीदत्त संस्थान करते. या श्रीदत्त संस्थानबद्दल थोडक्यात माहिती.
स्थापना
श्री पंत महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या शिष्यमंडळींना पोरके झाल्याप्रमाणे वाटू लागले. श्रीपंतांनी आपल्या हयातीत कोणतीही गादी स्थापन केली नव्हती व कोणतेही पूजास्थान निर्मीले नव्हते. हयात असतांना देव तेच वा त्यांच्या वास्तवाची जागाच देवालय होती. आपल्या गुरुंचे कायमस्वरूपी स्मारक उभारावे असे सर्व भक्तांना वाटू लागले. श्रीपंतबंधूंच्या पुढाकाराने "श्रीदत्त संस्थान, बाळेकुंद्री बुद्रुक" याची स्थापना झाली. हा दिवस होता २७/१२/१९०५ म्हणजे पौष शुद्ध प्रतिपदा, शके १८२७. श्रीपंतबंधूंनी आपल्या काही जमिनी संस्थेला दिल्या, इतरांनीही आपल्या इच्छेनुसार व ऐपतीनुसार हातभार लावला. हळूहळू संस्थानाचा पसारा वाढत गेला व त्याला कायदेशीर स्वरूप दिले गेले. १/६/१९३३ रोजी तो रजिस्टर केला गेला. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये मुंबईच्या कायद्यानुसार सार्वजनिक संस्था म्हणून नोंदणी झाली. सध्या श्रीपंतांचे वंशज व गावोगावच्या भक्तमंडळांचे सदस्य मिळून ही संस्था चालवतात.
उपक्रम
श्रीदत्त संस्थान अनेक उपक्रमाचे आयोजन करते. सर्वात मोठा श्रीपंत पुण्यतिथी उत्सव असतो. श्रीपंत जन्मोस्तव (श्रीपंत पाडवा), दत्तजयंती, श्री गुरु प्रतिपदा, श्रीपंत मंगलविवाहदिन असे उत्सव सालाबादप्रमाणे केले जातात. याच वेळापत्रक लवकरच इथे दर्शविले जाईल. गावोगावची भक्तमंडळेही अनेक उपक्रम करतात. ह्या कार्यक्रमांना संस्थानाचे पूर्ण सहकार्य लाभते. आगामी कार्यक्रमांबद्दल माहिती येथे दिली आहे.
If you cannot see it properly, click here
Click here for English versions