
(संग्रही ठेवण्याच्या फोटोसाठी वरील फोटोवर राईट क्लिक करा व "Save Target" हा पर्याय वापरा)

आमचे प्रेरणास्थान
सद्गुरू दिगंबरपंत रवळेकर
नित्यपठणाच्या ५२ श्लोकी गुरुचरित्रासाठी येथे क्लिक करा.
अवधूत संप्रदाय
|
॥ गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर: ॥ ॥ गुरू: साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरूवे नम: ॥ |
अवधूत संप्रदाय हा गुरु दत्तात्रेयांनी स्थापन केला. दत्त अवताराचे स्वरूप दुष्टांच्या संहाराच्या आक्रमक वृत्तीचे असण्यापेक्षा साधूंच्या परित्राणासारखे विधायक वृत्तीचे आहे. दत्तात्रेय हा योगमार्गाचा उपदेशक असून त्याचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. तो विश्वाचा गुरु आहे. त्याने अष्टांग योगाची सर्व अंगे आपल्या शिष्यांना स्पष्ट करून दाखवली आहेत. तो अवधूत योगी दिगंबर, स्वैर संचारी व धर्माधर्मद्वंद्वविरहीत आहे. तो वर्णाश्रमांच्या कक्षा मानत नाही व सर्व विषय भोगूनही तो निर्लेप असतो. तो मलंगरूपात भिक्षा मागत फिरतो, त्याच्यासंगे नेहमी गाय व श्वान असतात. त्याचे वास्तव्य औदुंबरातळी असते.
|
अवतारही उदंड होती । सवेंचि मागुते विलयाला जाती ॥ तैसी नव्हे दत्तात्रेय मूर्ती । नाश कल्पांती असेना ॥ पूर्ण ब्रम्ह मुसावले । ते हे दत्तात्रेय रूप ओतिले ॥ |
दत्तमूर्तीचे स्वरूप
गुरु दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेक संतांना झाला आहे. एकमुखी व द्विभुज मूर्ती पूर्वी भजली जात असे. तेराव्या शतकापासून तीन मुखे व सहा हात असलेली मूर्ती रूढ आहे. ब्रम्हा विष्णू व महेशाची रूपके म्हणून तीन शिरे व सहा हात. वरच्या दोन हातात विष्णूसूचक शंख व चक्र, मधल्या दोन हातात शिव-सूचक डमरू आणि त्रिशूल (काही मूर्तीत गदा) तर खालच्या दोन हातातील माला व कमंडलू ही ब्रम्हदेवाची सूचके आहेत. सत्व-रज-तम गुणांची रूपकेही दाखवता येतात. माला व कमंडलू सत्वाची, शंख व चक्र ही रजाची तर त्रिशूल व डमरू ही तमाची प्रतीके मानली जातात.
गुरु दत्तात्रेयांचे केस लांब असून जटाभार रूपे त्यांच्या शिरावर वसतात. सर्वांगाला विभूती लावलेली असते. त्याने व्याघ्रांबर नेसले असून त्याच्या पायी खडावा आहेत. पृथ्वीचे प्रतीक गाय त्याच्या मागे असते तर चार श्वान ही चार वेदांची प्रतीके मानतात. हिंदुत्वातला सर्वात पुज्य प्राणी गोमाता व सर्वात तुच्छ समजला जाणारा कुत्रा त्याच्यासमवेत असतात.
|
तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ॥ १ ॥ काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ॥ २ ॥ माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ॥ ३ ॥ शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥ ४ ॥ तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥ ५ ॥ |
दत्तजन्माच्या कथा
गुरु दत्तात्रेयंच्या जन्म अत्री मुनींच्या पत्नी साध्वी अनुसयेच्या पोटी झाला. हिंदू धर्मात ब्रम्हदेव, विष्णू आणि शंकर असे तीन देव मुख्य मानले जातात. या तिघांनी मिळून पतिव्रता अनुसयेच्या उदरी अवतार घेतला. एका कथेनुसार या तिघांनी तिच्या पातिव्रत्याची परिक्षा घेतली व ती उत्तीर्ण झाल्याने संतुष्ट होउन मानवजातीच्या कल्याणार्थ दत्तावतार घेतला. दुसरी कथा सांगते की अत्री ऋषींच्या पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या तपाने हे तिन्ही देव प्रसन्न झाले. अजून एक कथा कौशिक राजाबद्दल आहे. त्या कथेत कौशिक राजाची पत्नी शांडिलीच्या व अनुसयेच्या पातिव्रत्याच्ये महत्व सांगीतले आहे. सती शांडिलीने पतीचे प्राण रक्षणासाठी सुर्योदयच थांबवला होता तर सती अनुसयेनी देवांच्या प्रार्थनेनुसार यमराजाकडून कौशिकाचे प्राण परत आणले होते.
दत्तगुरुंचे अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्ताचे पहिले अवतार समजले जातात व श्रीनृसिंहसरस्वती दुसरे.श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीनृसिंहसरस्वती
श्रीनृसिंहसरस्वती जेव्हा गाणगापूराहून निघून कर्दळीवनात गुप्त झाले ते अक्कलकोटला प्रगटले.श्री स्वामी समर्थ
पंत महाराज बाळेकुंद्री
अनुभवाला हिंदुधर्मात फार महत्व आहे. कोरडे तत्वज्ञान बरेच जण सांगतात. अनुभव देउन त्या तत्वांतील गुह्ये विषद करून सांगणारा आमचा गुरु वेगळाच. अवधूत सम्प्रदाय खूप लोकांनी बदनाम केलाय. पाण्यात राहून कमळाच्या पानासारखे कोरडे रहाणे सगळ्यांना जमत नाही. संसार तर करायचा वर त्यातून मुक्तही व्हायचे ही कला आम्ही सद्गुरुकडून शिकलो. अवधूताची तत्वे उलगडून दाखवणारा आमचा सद्गुरु हाही दत्ताचाच अवतार आहे.माणिकप्रभू
वासुदेवानंद सरस्वती - टेंबे स्वामी
दासोपंत
श्री निरंजन रघुनाथ
जनार्दनस्वामी
एकनाथ
मुक्तेश्वर
याव्यतिरिक्त वासुदेवानंद सरस्वतींनी व दासोपंतांनी दत्तगुरुंचे सोळा अवतार वर्णीले आहेत.If you cannot see it properly, click here
Click here for English versions