(You can right click on the image and select "Save Target" to download a larger image)
Our inspiration
Sadguru Digambarpant Ravalekar नित्यपठणाच्या ५२ श्लोकी गुरुचरित्रासाठी येथे क्लिक करा.
पंत महाराज बाळेकुंद्रीकरांची थोरवी सांगणारी वेबसाईट
आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण भारतातील एक महान संत. भारतभूमीने भक्तीमार्गात सर्व जगाचे नेतृत्व अनादि काळापासून केले आहे. ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदासांसारखे थोर संत या भूमीने पूर्वी दिलेच आहेत पण ही परंपरा अजूनही जीवित आहे. अक्कलकोट स्वामी, माणिकप्रभू व रामकृष्ण परमहंसांसारखे संत हेच दर्शवतात. ह्या संतांनी संसार सांभाळून परमेश्वर प्राप्तीचे मार्ग दाखविले.
श्री पंत महाराजांनी अंतरात्म्यातील परमेश्वराचे दर्शन घडवीले. त्या अनंताशी एकरूप होण्यासाठी क्लिष्ट योग, त्राटके वा संन्यासाची गरज नसल्याचे सिद्ध केले. भजन, नामस्मरणानेही ईश्वरप्राप्ती होते असे सांगीतले. सहजसमाधी, अजपाजप यासारखी साधने सोपी करून दिली. प्रेमाची महती, गुरुभक्तीतील शक्ती विषद केली. सद्गुरु फक्त मार्गदर्शकच नसतो तर शिक्षक व मित्रही असतो असे सांगीतले. पंत महाराज अवधूत योगी होते.
आम्ही सर्व त्यांच्या परंपरेतील शिष्य आहोत. आमचा उद्धार तर झालाच आहे पण अजूनही त्यांचे विचार सर्व जगापुढे न्यावयाचे आहेत. यासाठीच या वेबसाईटचे प्रयोजन. या कल्पवृक्षाखाली जे जे वांछिले ते तर मिळालेच पण न कल्पिलेलेही मिळाले, असा सद्गुरु कुठे मिळणार.
If you cannot see it properly, click here
Click here for English versions