बाळेकुंद्री

पंत महाराजांचा मठ बेळ्गावजवळील बाळेकुंद्री या गावी आहे.मठ छोट्याशा या खेडेगावात हिरव्यागार आमराईत हा मठ वसलेला आहे. मंदिरात पंत महाराजांच्या पादुका आहेत. आपण तेथे अभिषेक करू शकता. सोवळे नसल्यास ऑफिसातून तात्पुरते मिळू शकते. मंदिराच्या मागील बाजूस औदुंबर वृक्ष आहे. पंत महाराजांच्या पार्थिवावर येथे अग्निसंस्कार झाला होता. त्या औदुंबराच्या पार्‍यावर बसून पोथी वाचायची असते. मंदिराच्या तळघरात पंतांच्या बंधूंची समाधी आहे.

समोरच्या सभागृहात ॐ नमः शिवायचा जप अहोरात्र चालू असतो. आमराईच्या मागे धूनी आहे. त्याचे दर्शनही घ्यावयाचे.

संस्थानाकडून येणार्‍या भक्तांकरिता जेवणाची सोय असते. विषेश म्हणजे हे अन्नदान पुर्णता मोफत असते. पंतांच्या पत्नी यमुनक्कांचे हे स्वयंपाकघर आहे. अभिषेकानंतर आपण इथे प्रसाद घ्यायचा असतो. मंदिराच्या आवारात धर्मशाळा आहेत. त्यात रहाण्याची सोय होऊ शकते.

संस्थानातर्फे बरीच लोकोपयोगी कार्ये चालत असतात. सद्गुरुंचे आयुष्य शिक्षकी पेशात गेले. त्याची आठवण म्हणून संस्थान एक शाळा चालवते.

कसे जायचे


View Larger Map

बेळगावहून शहर वाहतूकीच्या बस सतत पंत बाळेकुंद्रीला जात असतात. सदर बसचा स्टॅंड मुख्य बस स्टॅंड जवळच आहे. बस मात्र पंत बाळेकुंद्रीची अथवा सुळेभावीची पकडायची, कारण बाळेकुंद्री गावाचा थांबा अलिकडे आहे.

बेळगाव

बेळगाव शहरात पंत महाराजांनी बरेच आयुष्य व्यतीत केले. समादेवी मंदिराजवळ त्यांचा वाडा होता. सध्या तिथे पंतांचे मंदिर आहे (पंत प्रसाद कॉम्प्लेक्स), श्री अवधूत प्रकाशन मंडळाची प्रकाशने तेथे मिळू शकतात.

बेळगाव शहरातील रामकृष्ण मठही बघण्यासारखा आहे.

This is a web page in Marathi
If you cannot see it properly, click here

Click here for English versions