आम्ही दर गुरुवारी म्हणतो त्या आरत्या, पदे व अभंग

श्री गणप‍‍तीची आर‍‍ती |

सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।। धृ ।।

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।। ३ ।।

आरती श्री दत्तात्रेयाची

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।। धृ ।।

सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त। अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
पराही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्मामरणाचा पुरलासे अंत ।।२।।

दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला । जन्मामरणाचा फेरा चुकविला ।।३।।

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।।

पदे, अभंग

काषाय वस्त्रम् करदंड धारिणम् | कमंडलूम् पद्म करेण शंखम् ||
चक्रं गदा भूषित भूषणाढ्यम् । श्रीपादराजम् शरणम प्रपद्ये ||

कृतेजनार्दनो देव: त्रेतायाम रघुनंदन: |
द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपाद वल्लभ: ||
ब्रम्हानंदम परमसुखदम् केवलम् ज्ञानमूर्तीम् |
द्वंद्वातीतं गगनसदृशम् तत्वमस्यादि लक्षम् ||
एकम् नित्यम् विमलमचलम् सर्वधि: साक्षीभूतम् |
भावातितम् त्रिगुण रहितम् सदगुरूं तन्नमामि ||

गोरक्ष जालंदर चर्पटाक्ष |
अडबंग कान्हिप मच्छिंदर आद्या ||
चौरंगो रेवाणांक भृतुहरी संज्ञा |
भूम्यां बभवु: नवनाथ सिद्धा: ||
नवनाथ महाराज की जय ||

आरती

शिव शिव शिव शिवाय नम: ॐ |
सदा स्मरणी शिव नामा ॐ || धृ ||
जय शिवशंकर उमाधवा पतीत पावन सदाशिवा ||
अवधूत जय जय अवधूत | अवधूत जय जय अवधूत || १ ||
नारायण विधी अत्रीनाथ | दत्त जनार्दन एकनाथ ||
जय श्री गणेश | जय गं गणेश || २ ||
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई | एकनाथ नामदेव तुकाराम ||
जयहरि विठ्ठल विठ्ठल जयहरि विठ्ठल विठ्ठल || ३ ||
राम राम राम भजरे मना | असा काय नरदेह येईल पुन्हा |
जय रघूनंदन जय श्रीराम | पतीत पावन राजाराम ||
श्रीराम जयराम जयजयराम | श्रीराम जयराम जयजयराम || ४ ||
जयदत्ता गुरुदत्ता परमानंदा अवधुता ||
गोविंद राधे गोविद | गोविंद राधे गोविद || ५ ||
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
यशोदानंदन श्रीकृष्ण यशोदानंदन श्रीकृष्ण || ६ ||
त्रिभुवन चालक जयगंगे कृपाकटाक्षे भवगंगे ||
जयअंबे जगदंबे कृपाकटाक्षे भवगंगे || ७ ||
दत्त दिगंबर | नरहरि गुरुवर | हरीहर बालमुकुंद |
भोगी सहज सिद्धानंद | लक्ष्मी शारंगधर सितापाते |
रघुवीर | राधा गोविंद | रखुमाई पांडुरंग || ८

पदे

दत्तराज माऊली ग माय माझी दत्तात्रेय माऊली ||
देवूनी भक्ती भजन करवी |
करी कृपा साऊली ग माय माझी || १ ||
दत्तात्रेय माऊली ||
निर्गुण मुळीची सगुण होउनी |
भक्तांसाठी धाऊनी ग ग माय माझी || २ ||
दत्तात्रेय माऊली ||
दत्त अवधूत भजनी रमता |
प्रेमानंदी धाऊनी ग माय माझी || ३ ||
दत्तात्रेय माऊली ||

मी बाळ तू जननी सद्गुरू मी बाळ तू जननी |
कुरवाळूनी घेई पदरी लावी प्रेमस्तनी || १ ||
सर्वाधार माते तुझी, अनन्य त्रिभुवनी || २ ||
बहू भागलो निजी निजवी, दत्त निरंजनी, पंत निरंजनी || ३ ||

अभंग

आठवू किती उपकार गुरुमायेचे |
विसरू कसे उपकार || धृ ||
भक्त जनांची प्रेमळ माता |
लोटी निज प्रेमपूर || १ ||
सायूज सजनी नेऊनी सहज |
दत्त श्रमला फार, पंत श्रमला फार || २ ||

अभंग

गुरुप्रेम दिधले गुरु भक्तालागी | केले प्रेमयोगी कृपाबळे |
रूपनामातीत खूण दावीयेली | फेरी चुकविली चौ-यांशीची ||
वारामध्ये आहे मुख्य गुरवार | करी सारावार संसाराची ||
रसिक सुबोध याच दिनी झाला | अंगिकार केला मोरयाचा ||
गुरुप्रेम दिधले गुरु भक्तालागी ||

आरती

गुरुवार दत्त दरबार, असे सुंदर, भक्त येती फार,
दर्शनासाठी, गुरुदेव वंदूनी त्यासी वाहती त्रिपूटी || धृ ||
काय सांगू गुरूच्या प्रेम, नाही त्या उपमा, नेई निजधामा,
हाती धरुनीया, हरीहर ब्रम्ह वंदीती गुरूच्या पाया || १ ||
निजबोध प्रेरला कर्णि, प्रगटला तरणी, शुद्ध झाली धरणी,
तीर्थ प्रसादे, अहंस्फूर्ती निमाली सद्गुरूच्या प्रमोदे || २ ||
देऊनी अभय भक्ताला निशिदिनी | कृपाहस्त मस्तकी ठेवी अंकी घेवूनी ||
निजप्रेम- स्तनी लाउनी निजवी उन्मनी |
असा गुरु मिळेना कदा, चुकवी आपदा, देई संपदा, आत्मज्ञानाची,
अनन्य शरण जाउनी भेट घ्या त्याची || ३ ||

अवधुताची आरती

आरती अवधूता | जय जय आरती अवधूता || धृ ||
मी तू पणाचा भाव टाकुनी | दर्शन दे संता || १ ||
ज्ञानाज्ञान खेळ कल्पूनी | सुख देसी चित्ता || २ ||
प्रेमास्तव हा जन्म घेतला | बाणली खूण दत्ता || ३ ||

बालमुकुंदाची आरती

आरती बालमुकुंदाची | भक्ता सुखकर हो साची || धृ ||
खेळसि स्वरूप संगमी | त्रिपुटी नाही तुझे नामी ||
ऐसा अनादि तू स्वामी | निजपदी भाव नसे 'तूमी' ||
हरिहर ब्रम्ह नमिती ज्याला, जगाचा कंद, बालमुकुंद, देई आनंद,
अघटित करणी असे त्याची | पतीता आवड भक्तीची || १ ||

निशिदिनी करा परा भक्ती | मिळवा सायुष्याची मुक्ती ||
सर्वांठायी तुझी शक्ति ऐसे कथिले वेदांती ||
राहुनी अलिप्त संसारी, जाणूनी वर्म, आचरी कर्म, वाढवी धर्म,
शोभा अद्भुत उन्मनीची || ज्योति स्वयं प्रकाशाची || २ ||

शरीरी जैसी असे छाया | स्वरूपी तैसी पहा माया ||
नरतन दवडू नको वाया | कोण मी शोधी निज ठाया ||
अंजन घालूनीया डोळा, आत्म सोहळा, दावी वेल्हाळा, अद्भुतचि कळा,
निरंतर कृपा असो तुमची || राखी लाज तू मोरयाचि || ३ ||

शेवट गोड करी | दत्ता || धृ ||
तन मन धन आशा अर्पिली चरणी |
कर्तुत्व नाही उरी || दत्ता || १ ||
नलगे भुक्ति नलगे मुक्ति |
भजनी प्रीत भरी | दत्ता || २ ||
बालावधूता सद्गुरूदत्ता |
धरी मज प्रेमे करी | दत्ता || ३ ||

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे | त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ||
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी | तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही ||

गुरु-चरण प्रतापे पुण्य पापे जळाली |
त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली ||
शुभ अशुभ पाहता भावना राम झाली |
निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली ||

शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको |
योगाभ्यास नको, तीव्र तपे ती नको ||
काळाचे भय मानसी धरू नको दुष्टांसी शंकू नको |
ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको ||

दिगंबरा रे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |

|| राजाधिराज योगिराज सद्गुरू श्री पंत महाराज की जय ||

|| श्री गुरुदेव अवधूत ||

|| ॐ नम: शिवाय ||



This is a web page in Marathi
If you cannot see it properly, click here

Click here for English versions