मुख्य पान
अधिक माहिती
पंतांचे चरीत्र
पंतांची शिकवण
पंतांचे साहित्य
अवधूत संप्रदाय
बाळेकुंद्री
श्रीदत्त संस्थान
संदर्भ
सद्गुरु
(संग्रही ठेवण्याच्या फोटोसाठी वरील फोटोवर राईट क्लिक करा व "Save Target" हा पर्याय वापरा)
नित्यपठणाच्या ५२ श्लोकी गुरुचरित्रासाठी येथे क्लिक करा.

चर्चा शिबीर- जानेवारी २०१२

आयोजक व निमंत्रक

श्रीपंत भक्त मंडळी, लालबाग केंद्र, मुंबई

दरवर्षाप्रमाणे श्रीपंत भक्त मंडळी, लालबाग केंद्र, मुंबई, या श्रीपंत भक्तांच्या छोट्या चमूच्या विद्यमाने रविवार दि. १५/०१/२०१२ ते बुधवार दि. १८/०१/२०१२ या दिवसांत श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे चर्चा शिबीर या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिबिराचे हे विसावे वर्ष आहे.

शिबिरात भाग घेण्यासाठी कसल्याही अटी नाहीत. सांप्रदायिक व इतर सद्भक्त या शिबिरात भाग घेऊ शकतात. मात्र शिबिराचे पहिले सत्र सुरु होण्यापूर्वी सर्वांनी उपस्थित व्हावे व शिबिराचे सर्व कामकाज संपल्यानंतरच परतावे अशी अपेक्षा आहे. शिबिरात भाग घेण्यासाठी कसलेही शुल्क नाही. मात्र शिबिराच्या काळात आपण घेतलेल्या प्रत्येक भोजना पाठीमागे रु. २५/- अशी देणगी अगदी प्रामाणिकपणे केंद्राच्या कार्यकर्त्यांकडे शिबिरार्थ्यांनी जमा करायची आहे. ज्यांना अशी देणगी देण्याची आर्थिक कुवत नसेल, अशा बंधूभगिनींचेही शिबिरात स्वागतच आहे.

या वर्षी शिबिरात चर्चा करण्यासाठी श्रींची बोधवाणी पुष्प ७ व ८ यातील सुरुवातीचे तीन पराग निवडलेले आहेत. या परागावरील प्रश्नपत्रिका मंडळाकडे मिळू शकेल. पत्ता खाली दिलेला आहे. मात्र पराग क्र. ३ व पराग क्र. ७३ यावरील प्रश्न शिबिरातच विचारले जाणार असून ते पराग नीटपणे वाचावे. यापैकी पराग क्र. ३ यावरील प्रश्न शिबिरार्थींना विचारण्यात येणार असून त्यांनी आपली उत्तरे तोंडी तयार करून यावे. तसेच पराग क्र. ७३ वरील प्रश्न शिबिरार्थींनी विचारावेत आणि मान्यवरांनी त्यांची उत्तरे द्यावीत असा एक नवीन कार्यक्रम आयोजित होणार आहे.

संपर्क

मे. वि. तु. नार्वेकर
१३, सोफी महाल,
डॉ. आंबेडकर मार्ग,
लालबाग, मुंबई १२.
दूरध्वनी ०२२- २४७१२७८४ दुकान, ०२२-२४१४८८७२ निवास.