
(संग्रही ठेवण्याच्या फोटोसाठी वरील फोटोवर राईट क्लिक करा व "Save Target" हा पर्याय वापरा)

आमचे प्रेरणास्थान
सद्गुरू दिगंबरपंत रवळेकर
नित्यपठणाच्या ५२ श्लोकी गुरुचरित्रासाठी येथे क्लिक करा.
श्रीपंतमहाराजकृत आरत्या
श्रीदत्तप्रेमलहरी या ग्रंथातील आरत्या या प्रकरणात एकूण ८४ आरत्या आहेत. त्यातील काही लोकप्रिय व पंतभक्तांच्या मेळाव्यात सतत गायल्या जाणाऱ्या या काही निवडक आरत्या :
आरती अवधूता || जय जय आरती अवधूता || धृ. || मीतूपणाचा भाव टाकुनी || दर्शन दे संता || १ || ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी || सुख देसी चित्ता || २ || प्रेमास्तव हा जन्म घेतला || बाणली खूण दत्ता || ३ || पद २६४२ |
दत्तात्रया ओवाळू तुज आरती || धृ. || काषायांबर दंड कमंडलू || संगे श्वान शोभती || १ || दीन दयाघन अमूर्तमूर्ती || अवतरसी जगती || २ || भक्तभिमानी भक्तवत्सल तू || दत्त भजन प्रीती || ३ || पद २६८० |
मंगलारती गुरुची करू || भवसागर सहज तरू || धृ. || ज्ञानविज्ञान उजळूनी ज्योती || निवारू ही मायाराती || १ || अहंभाव अर्पुनी पायी || बुडी देऊ स्वरूपडोही || २ || नित्यानंद समाधी भजनी || दत्त चरण नित्य ध्यानी || ३ || पद २६५७ |
ओवाळू आरती || गुरुसी || ओवाळू आरती || धृ. || तनमनधन वाती जाळूनी || भक्ती तेल वरुती || १ || स्वयंप्रकाश दीप्ती उजळूनी || हरू द्वैतभ्रांती || २ || त्रिपुटीरहित सद्गुरूअवधूत || दत्ता प्रेम चित्ती || ३ || पद २६५३ |
सर्वांठायी दत्त माझा || कवणा ओवाळू || धृ. || अंतर्बाह्य दत्त भरला || तोचि दयाळू || १ || नाही आर्ति केली आरती || स्वयंज्योती पाजळू || २ || भेदची नाही भक्ती कैची || परब्रम्ह केवळू || ३ || दत्तावधूत प्रेमस्वरूप || नित्य हृदयी कवळू || ४ || पद २६९६ |
प्रेमाची आरती || गुरुसी || प्रेमाची आरती || धृ. || द्वैताद्वैतवाती जळली || सहज स्वयंज्योती || १ || गुरुशिष्य निमले बोधसागरी || स्वानुभवदीप्ती || २ || आत्मस्वरूपी दत्त देखिला || नाही भिन्न स्थिती || ३ || |
राजाधीराज योगीराज श्रीसद्गुरू पंतराज महाराज कि जय || श्रीगुरुदेव दत्त अवधूत || |
This is a web page in Marathi
If you cannot see it properly, click here
Click here for English versions
If you cannot see it properly, click here
Click here for English versions