श्रीपंत वाङ्मय प्रकाशन मंडळाने बरेच साहित्य प्रकाशित केले आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत. अधिक विवरणासाठी त्या नावावर क्लिक करा. :-

श्रीपंतमहाराजकृत वाङ्मय


आरत्या

श्रीदत्तप्रेमलहरी या ग्रंथातील आरत्या या प्रकरणात श्रीपंतांनी रचिलेल्या सुंदर आरत्या आहेत. काही निवडक आरत्यांसाठी इथे क्लिक करा.

अन्य वाङ्मय

 • श्रीपंत गुरुचरित्र पोथी
 • श्रीपंत महाराजांचे चरित्र (ले. केशव रामचंद्र दिवेकर)
 • श्रीपंत महाराजांचे संक्षिप्त चरित्र (ले. वसंत भीमराव देशपांडे)
 • नित्य भजनावली
 • गगनमठीचा योगी (ले. डॉ. प्र. न. जोशी)
 • प्रेमावतारी संत (ले. डॉ. म. बा. जोशी)
 • श्रीपंतदर्शन ( ले. सदानंद नार्वेकर)
 • श्रीपंतांचे हिन्दी चरित्र (ले. प्रा. बाळ गुंजीकर)
 • अवधूतयोगी श्रीपंत (इंग्रजी चरित्र, ले. डॉ. इंदिरा खेर)
 • अल्प परिचय (श्रीपंतमहारज बाळेकुंद्री, श्रीदत्त संस्थान, श्रीक्षेत्र)
 • श्रीदत्त प्रेमलहरी संक्षिप्त गाथा
 • श्रीपंत चरित्र (गुजराथी)
 • श्रीपंतप्रेमामृत
 • अमृतबिंदू

कानडी वाङ्मय

 • श्री पंत चरित्र
 • भक्तालाप
 • प्रेमतरंग
 • अल्प परिचय

याशिवाय नामवंत गायक-गायिकांनी गायलेली भजने व आरत्या कॅसेट व सीडीरुपात उपलब्ध आहेत.
प्रकाशक व मिळण्याचा पत्ता :-
श्रीपंत वाङ्मय प्रकाशन मंडळ,
श्रीक्षेत्र बाळेकुंद्री,
जि. बेळगाव,
पिन कोड नं. 591103
इतरत्र मिळण्याची ठिकाणे
 • बाळेकुंद्रीच्या मठाशेजारील पुस्तकाच्या दुकानात
 • बेळगावातील समादेवी गल्लीतील पंत मंदिरा शेजारी
 • मुंबईत डॉ. डी. आर. वांगणेकर, 41, वाघ्याची चाळ नं 5, डिलाईल रोड, मुंबई 400 011.
 • कल्याण, मुंबईतील श्री. दत्ता झेमसे यांच्याशी (+91 9422479634) संपर्क साधून.

श्रीदत्तप्रेमलहरी

श्रीपंतांना भजन करताना स्फुरलेली अशी २७५५ भक्तिगीते उपलब्ध आहेत व ती या ग्रंथात एकत्रित केली आहेत. सर्व पदातून उज्ज्वल गुरुभक्ती, शुद्ध अद्वैतबोध, उत्कट गुरुप्रेम, कडकडीत वैराग्य, अंतरंगीची असंगता, दिव्य प्रबोधिनी शक्ती असे गुण प्रगट झाले असून प्रेमरस, नादमाधुर्य, अन्वर्थक व मार्मिक शब्दयोजना आणि संगीत हे गुणही एकवटलेले आहेत. सर्वच पदे अर्थालंकाराची सुंदर लेणी लेवून बाहेर पडली आहेत. यात पदे, अभंग, अष्टके, आरत्या, ओव्या, पाळणे, धावे आहेत. कानडी भाषेतील परंतु मराठी लिपीतील २५ पदेही आहेत.

भक्तालाप

आपल्या गुरूच्या वियोगामुळे झालेली तीव्र जाणीव श्रीपंतानी अत्यंत भक्तिभराने, काकुळतीने, सलगीने व ऐक्यभावाने यात गद्यरुपाने वर्णन केली आहे.

प्रेमतरंग व बोधानंदगुटिका

या निबंधात श्रीपंतानी संसाराची निःसारता, सद्गुरूस शरण जाण्याची आवश्यकता, तनमनधन अर्पण करणे म्हणजे काय, ॐ कारादी मंत्राच्या ठिकाणी धारणा कशी ठेवावी, इत्यादी गोष्टी वर्णिल्या आहेत. संसार हा परमार्थमय कसा बनवावा व जीवनमुक्ती कशी साधावी याचा थोडक्यात बोध केला आहे.

बाळबोधामृतसार

आत्मज्योति, अनुभव वल्ली व ब्रम्होपदेश

या पुस्तकातील आत्मज्योती या प्रकरणात त्यांना जंबूगिरी पर्वतावर झालेल्या सद्गुरूच्या प्रथम दर्शनाचे वर्णन केले असून श्रीदत्तात्रेयांपासून चालत आलेल्या आपल्या गुरुपरंपरेचा महिमा सांगितला आहे. तसेच "श्रीदतमहिमा" व "विश्वदर्शन" यांचेही वर्णन आहे.

अनुभव वल्ली या प्रकरणात 'उपशांत पुरुषास मोक्ष कशाने प्राप्त होतो?' असा प्रश्न श्रीपंतांनी मांडला आहे व प्रश्नोत्तर स्वरुपात त्याचे विवरण केले आहे. वेदांतशास्त्र रहस्यही उलगडून दाखवले आहे.

ब्रम्होपदेश या प्रकरणात श्रींनी प्रश्नोत्तर रुपात आध्यात्म विषयाचे श्रुतीशास्त्रांना धरून शास्त्रीय पद्धतीने प्रतिपादन केले आहे.

परमानुभवप्रकाश

या लेखात योगशास्त्राच्या व्यापक व गहन विषयावरील प्रमाणग्रंथ व आपला अनुभव याचे सार व मार्गदर्शन केले आहे.

स्फुट लेख भाग १, भाग २

श्रीसद्गुरूस्तोत्र, नाम-महात्म्य, आत्मबोध, साधकाचे कर्तव्य, साक्षात्कार, चमत्कार इत्यादि अनेक विषयांवर श्रींनी लिहिलेले लेख येथे संकलित केले आहेत. वेदांतातील गहन सिद्धांत व कठीण शब्दांचे अर्थही सांगितले आहेत. काही लेखांत धार्मिक व्रत-उत्सवादी विषय हाताळले आहेत.

बोधवाणी पुष्प ७ वे

भक्तोद्गार, प्रेमभेट व भगवद्गीतासार

या लेखात एक मुमुक्षू कर्म, उपासना व योग हे मार्ग क्रमाक्रमाने ओलांडूनही समाधान न झाल्याने अखेर अनन्य भावे सद्गुरूस कसा शरण गेला व पूर्ण समाधान पावला याचे वर्णन श्रीपंतांनी केले आहे. स्वानुभवाच्या आधाराने लिहिलेल्या या लेखात अद्वैतबोध सफाईने व अधिकाराने लिहिला आहे. या लेखात भक्तोद्धाराचे कर्तृत्व आपल्याकडे न घेता त्यांनी सद्गुरू बालावधुतांकडे दिले आहे व आपण फक्त एक प्रेक्षक होतो असे म्हटले आहे.

भगवतगीता या अद्वितीय ग्रंथाचे सार व महत्व एखादी गोष्ट सांगावी या स्वरुपात सांगितली आहे. गीतेतील मुळार्थ कायम ठेवून अनुरूप असे दृष्टांत देऊन प्रत्येक अध्यायाचे सार थोडक्यात दिले आहे.

श्रींची पत्रे

श्रीदत्तप्रेमलहरी पुष्प ९ खंड १ व खंड २

.

(यादी अपूर्ण, निर्माणाधीन)

This is a web page in Marathi
If you cannot see it properly, click here

Click here for English versions